Tuesday, 7 April 2015

शिक्षकांच्या जबाबदाऱ्या (RTE)

शिक्षकांच्या जबाबदाऱ्या

बालशिक्षण हक्क कायद्याप्रमाणे,सर्व शिक्षकांना पुढील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील:
  • शाळेत नियमितपणे आणि काटेकोरप्रमाणे येणे
  • नेमून दिलेल्या वेळेत संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे
  • प्रत्येक मुलाची शिकण्याची क्षमता मापून, आणि त्याप्रमाणे आवश्यकता भासल्यास, अशा मुलांची जादा पूरक शिकवणी घेणे
  • पालक आणि संगोपन करणार्याबरोबर नियमित सभा घेणे, आणि या सभांतून त्यांना मुलांची शाळेतील नियमित उपस्थिती, त्यांची शिकण्याची क्षमता,त्यांची शैक्षणिक प्रगती आणि मुलांबद्दलची यासंदर्भातील इतर माहिती देणे
  • बालशिक्षण हक्क कायद्यात नमूद केल्याप्रमाणे इतर जबाबदाऱ्या पार पाडणे
शिक्षकांच्या शिकवण्याच्या कामात ढवळाढवळ न करता,त्यांनी त्याव्यतिरिक्त कोणती कामे करावीत याची एक यादी महाराष्ट्राचा नियमांत दिलेली आहे:
  • प्रत्येक मुलाची संपूर्ण माहिती असलेली एक फाईल ठेवणे, ती फाईलच प्रत्येक मुलाला त्याने प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले आहे असे प्रमाणपत्र द्यायला उपयोगी पडेल
  • प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणे
  • अभ्यासक्रमाच्या आखणीत आणि अभ्यासक्रमाच्या, प्रशिक्षणाच्या साच्यांच्या
विकासात, पाठ्यपुस्तकांच्या विकासात आणि मूल्यमापनांच्या विकासात सहभागी होणे
  • जवळपासच्या परिसरातील शाळाबाह्य मुले हेरणे आणि जवळच्या शाळेत त्यांची भरती होईल याची खातरजमा करणे
  • शाळेत भरती झालेल्या मुलांच्या नियमित उपस्थितीची खातरजमा करणे
  • शाळेचे मुख्याध्यापक,किंवा जिथे मुख्याध्यापक नसतील अशा ठिकाणी शाळेतील सर्वात ज्येष्ठ शिक्षक हे शाळा व्यवस्थापन समितीचे अनधिकृत सभासद-सचीव असतील. त्यांच्या जबाबदाऱ्यांत निवडणुकीशी संबंधित कामे आणि शाळा व्यवस्थापन समिताच्या मासिक सभा घेणे समाविष्ट आहे
बालशिक्षण हक्क कायद्याच्या नियमावलीत सुविधांची,त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेत शिक्षकांची संख्या किती असावी हेही सांगितलेले आहे,त्यात नमूद केल्याप्रमाणे,शिक्षकांनी किमान 45 शिकवण्याचे तास घेतले पाहिजेत, त्यातच पूर्वतयारीच्या तासांचाही समावेश आहे

2 comments: